सुनीती सु.र. (कार्यकारी संपादक, 'आंदोलन शाश्वत विकासासाठी')

Primary tabs

'आंदोलन शाश्वत विकासासाठी' या आमच्या मासिकाच्या वेबसाईटचे काम 'रेनटेक सोल्यूशन्स'ने जानेवारी २०१२ मध्ये केले आणि 'आंदोलन' मासिकाला एकदम जागतिक पातळीवर अॅक्सेस मिळाल्यासारखंच झालं. आता कुणीही कुठल्याही अंकाविषयी, लेखाविषयी विचारणा केली तर झटकन वेबसाईटवर बघायला सांगता येतं. आमचे जगभर विखुरलेले मराठी जाणणारे समर्थक, कार्यकर्ते, ज्यांच्यापर्यंत अन्यथा आम्ही पोहचू शकत नव्हतो, त्यांच्यापर्यंत आता सहजगत्या पोहचत आहोत. शिवाय पीडीएफ व युनिकोड या दोन्ही पद्धतींनी अंक बघता येत असल्यामुळे वाचकांची चांगलीच सोय झाली आहे. वेबसाईटचं स्वरूपही अत्यंत युजर फ्रेंडली व आकर्षक आहे. आता 'आंदोलन'चे मागील सर्व अंकही वेबवर टाकण्याचा आमचा मानस आहे, तसंच आणखी काही सोयी निर्माण करून लेखकाचे नाव किंवा अगदी एखाद्या शब्दाच्या संदर्भाने देखील आवश्यक ती माहिती वाचकांना एका क्लिक् वर उपलब्ध होईल असा आमचा प्रयत्न आहे.
SEO Url: 
suniti